छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने नुतन नगराध्यक्षा सौ. सुनंदाताई शिवाजी(आप्पा )कापसे यांचा सत्कार - kalayog

२४ डिसेंबर, २०२५

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने नुतन नगराध्यक्षा सौ. सुनंदाताई शिवाजी(आप्पा )कापसे यांचा सत्कार

कळंब. छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब यांच्या वतीने  दि.२२/१२/२०२५ सोमवार रोजी कळंब नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांचा छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. 
   संस्थेचे अध्यक्ष मा.शाम (नाना) खबाले, सहसचिव प्रा.संजयजी घुले,प्राचार्य. हनुमंत माने तसेच डॉ.विद्युलता पवार,प्रा.मनिषा कळसकर, प्रा.सुनिता चोंदे व सौ.घुले मॅडम या मान्यवरांच्या हस्ते कळंब नगर परिषदेच्या नुतन नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांचा शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नुतन नगरसेवक लखन गायकवाड यांचाही  यावेळी शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य.डॉ.हनुमंत माने यानी कॉलेजच्या सर्व स्टाफ तर्फे नुतन नगराध्यक्षा सौं.सुनंदा शिवाजी कापसे  यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.तसेच याप्रसंगी माजी प्राचार्य.श्री.कांबळे सर तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱी यांनीही  नुतन नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.