भोगजी येथे माजी विद्यार्थी मेळावा व माजी शिक्षक सन्मान सोहळा संपन्न - kalayog

२५ ऑक्टोबर, २०२५

भोगजी येथे माजी विद्यार्थी मेळावा व माजी शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

                               
भोगजी ता .कळंब येथे दि . २३ रोजी जि .प . प्रा . शाळेत माजी विद्यार्थी मेळावा व माजी शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला .
प्रथम आजी माजी विद्यार्थांनी दुतर्फा पुष्पांचा वर्षाव करत माजी शिक्षकांचे आगमन स्वागत केले . मान्यवर शिक्षकांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर माजी शिक्षक श्री . विश्वनाथ गंभीरे सर, श्री . किशन जगदाळे सर, श्रीमती घोळवे मॅडम, श्री . दिगांबर डाके सर, श्री . चौरे सर, श्री . केंद्रे सर, तौफिक मुल्ला सर, श्री. डांगरे सर श्री . बनसोडे सर, श्री बाळासाहेब चौधरी सर, श्री . गरड सर या शिक्षकांचा शाळेच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल फेटा बांधुन सन्मान केला. तदनंतर व्यासपीठावर औपचारिकरित्या शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जुण्या आठवणींना उजाळा देत उत्तरोत्तर होत असलेल्या शालेय प्रगतीबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
या मेळाव्याच्या निमित्ताने बाहेरगावी कामानिमित्त असलेले माजी विद्यार्थी बऱ्याच वर्षांनी एकत्र आले, आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेताना सर्वजण आनंदित झाल्याचे वातावरण दिसून आले .विविध क्षेत्रात यशस्वी झालेले प्रगतीपथावर असलेले आपले विद्यार्थी पाहून शिक्षक बांधव ही भारावून गेले .या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना गौरवाची लेखणी व मायेचे गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावर्षी भोगजी परिसर अतिवृष्टीने बाधित झाल्या मुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून डॉ . संजय व्होरा न्युरो सर्जन B J मेडीकल कॉलेज मुंबई यांच्या आर्थिक सहाय्यातून व व डॉक्टर शरदचंद्र घोळवे रूबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजी येथील पहिली ते सातवी पर्यंतच्या 125 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर रजिस्टर कंपास पेटी रंगपेटी आलेख वही ड्रॉइंग वही पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . ही मदत प्राप्त करून देण्यासाठी आढाळा येथील शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री . राजेंद्र बिक्कड ,प्रसिद्ध शिवव्याख्याते शिक्षक महादेव खराटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
शाळेचे मुख्याध्यापक डॉ .शिवाजी चव्हाण यांनी आपल्या शाळेतील भौतिक सुविधांच्या उपलब्धतेबद्दल चर्चा केली असता शक्य आहे त्यांनी आपापल्या परीने आर्थिक मदत घोषित केली व लागेल त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले .विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी 501 पुस्तके , विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर व्हावे यासाठी अक्षर सुलेखन लेखणी संच देण्याची देखील दात्यांनी घोषणा केली स्वप्नपूर्ती कनस्ट्रक्शनच्या वतीने स्टेज तयार करून देण्यणचे अभिवचन अध्यक्षांनी दिले. उपस्थितीतांनी देखील शालेय गरजा भागविण्यासाठी आर्थिक सहकार्य केले व शिष्यवृत्ती नवोदय परिक्षेतील विद्यार्थाना बक्षीस ही घोषीत केले .शाळेला गावाचा आधार गावाला शाळेचा अभिमान हे सांगत असताना मुख्याध्यापक डॉ . चव्हाण यांनी सांगितले की आम्ही आपले विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण घडवण्याची परंपरा कायमपुढे ठेवण्यासाठी आटोकाठ प्रयत्न करू, आपले सहकार्य सदैव असू द्यावे असे आवाहन केले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राजेभाऊ खराटे, उपाध्यक्ष रामराजे अप्पाराव आडसुळ, इतर सर्व सदस्य,सरपंच श्री. बालाजी आडसुळ, मुख्याध्यापक डॉ . शिवाजी चव्हाण , सहशिक्षक श्री .वनवे सर , श्री . बोबडे सर , श्री . डोंगरे सर , युवा प्र . श्री . राहूल खराटे , श्री विकास जाधवर यांनी परिश्रम घेतले....