सर्वोदय विद्यालयात श्री.गौतम जाधवर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न - kalayog

४ नोव्हेंबर, २०२५

सर्वोदय विद्यालयात श्री.गौतम जाधवर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

 



भोगजी ता. कळंब येथील सर्वोदय विद्यालयात    दि. 04/11/2025 वार मंगळवार रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधवर गौतम अर्जुन (भाऊ) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शाळेमध्ये सेवापुर्ती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रथमता सर्व प्रमुख पाहुण्याचे स्वागत शाळेतील मुलींनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश काका जाधवर, प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी सुशील फुलारी साहेब तसेच केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन मुख्याध्यापक श्री वाघमारे चंद्रकांत यांनी केले. यावेळी जि प प्रा शा आढाळा चे मुख्याध्यापक बिक्कड सर यांनी अनमोल मार्गदर्शन केले. तसेच शिवव्याख्याते महादेव खराटे सर यांनी जाधवर (भाऊ)सर यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाला जाधवर सर यांच्यावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक बालासाहेब चौधरी सर, मुख्याध्यापक चव्हाण सर, मुख्याध्यापक निशिकांत आडसुळ, वडजीचे प्रथम नागरिक सुनिल जाधवर, संस्थेचे सदस्य विक्रम मुंढे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे सर, पी. एस. शिंदे सर, उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी शाळेतील सहशिक्षक रामहारी मुंडे,सौ.घुले मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी दिपक घुगे, सुनील हांगे, भागवत शिंदे, खराटे सी. के. यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव श्री जाधवर संजय यांनी केले.