कळंब: ' वंदे मातरम्'या गीताला दिडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथे शुक्रवारी दि.o७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीताचे सामुहीक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कौशल्य,रोजगार, उद्योजकता व सास्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र शासन व छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब यांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात 'वंदे मातरम्' या गीताचे सामुदायिक गायनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.हनुमंत माने कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.शशिकांत जाधवर आयक्युएसी समन्वयक डॉ.अनिल जगताप एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.मनिषा कळसकर,प्रा.अभिमान ढाणे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
