कळंब : अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स रग्बी लीग -वेस्ट झोन राजस्थान येथे या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र संघातून छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बी.एस्सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.अनुजा पवार हिने या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक पटकाविले.
कु.अनुजा पवार हिने राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स रग्बी लीग - वेस्ट झोन या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल कॉलेजच्या वतीने संस्थेचे सहसचिव प्रा.संजय घुले, प्राचार्य.डॉ. हनुमंत माने क्रिडाप्रशिक्षक प्रा.शिव खबाले तसेच डॉ.विद्युलता पवार या मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन अनुजा पवार हिचे अभिनंदन केले.यावेळी प्रा.सुनिता चोंदे प्रा.मनिषा कळसकर (एनएसएस जिल्हा समन्वयक धाराशिव ) सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले. अनुजा पवार हिला प्रा.शिव खबाले यांचे मार्गदर्शन लाभले.