विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत- तहसीलदार हेमंत ढोकले - kalayog

१० ऑक्टोबर, २०२५

विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत- तहसीलदार हेमंत ढोकले

 



विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत- तहसीलदार हेमंत ढोकले.                          कळंब. आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी श्री. हेमंजी ढोकले  तहसीलदार कळंब व श्री भागवत सरडे  तालुका कृषी अधिकारी कळंब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा शाळेला अकस्मित भेट दिली.  याप्रसंगी तहसीलदार यांनी शालेय परिसर, स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांची व्यवस्था, गुणवत्ता व शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक, उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार हेमंत ढोकले म्हणाले आपण मोबाईल पासून दूर राहा. शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ आवश्यक आहे यासाठी सर्वांनी खेळामध्ये सहभाग घेऊन व्यायाम करावा. सकस आहार घ्यावा व दैनंदिन नियमित अभ्यास करावा. आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावेत, गुरुजनांनी दिलेला उपदेश काळजीपूर्वक ऐकावा जेणेकरून आपण उद्याचे उज्वल भारताचे सक्षम नागरिक व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी  तहसीलदार महोदयांनी आम्हाला व शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध शिवव्याख्याते उद्योजक उपक्रमशील शिक्षक श्री. महादेव खराटे सर व प्रस्ताविक सहशिक्षक तुकाराम कराळे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक बलभीम राऊत व शिवानंद स्वामी यांनी परिश्रम घेतले.