अंतर महाविद्यालयीन महिला हॉलीबॉल स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा डंका - kalayog

१५ ऑक्टोबर, २०२५

अंतर महाविद्यालयीन महिला हॉलीबॉल स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा डंका

 


कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छत्रपती संभाजीनगर व आर..बी.अटल कॉलेज, गेवराई जि.बीड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित 'अंतर महाविद्यालयीन महिला हॉलीबॉल टुर्नामेंट सेंटर झोन 2025-26' चे आयोजन गेवराई जि.बीड येथे करण्यात आले होते. 

आयोजित केलेल्या महिला हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंबच्या विद्यार्थीनींनी र्हॉलीबॉल  क्रिडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांचे पटकवला.यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थीनी   संजना,सोनिया,निकीता देवी,श्रेषा कांबळे,आकांक्षा कवडे,प्रतिक्षा बचुटे व अनुजा पवार या सर्व विद्यार्थिनीने हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल विजयी उमेदवाराचे प्रथम क्रमांकाचे चषक, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

   या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव मा.शिवाजी (आप्पा) कापसे अध्यक्ष.श्री.श्याम (नाना) खबाले,उपाध्यक्ष प्रा.अविनाश मोरे,सहसचिव प्रा.संजय घुले ,मा.श्री.भागवत चोंदे,कोषाध्यक्ष श्री.बाळकृष्ण गुरसाळे, प्राचार्य डॉ.हनुमंत माने व प्रा.शिव खबाले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.प्रा.शिव खबाले यानी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.