अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे घवघवीत यश - kalayog

१३ ऑक्टोबर, २०२५

अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे घवघवीत यश

 


कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित 'अंतर महाविद्यालययीन मुले व मुली कुस्ती स्पर्धा 2025 ' आयोजन नळदुर्ग जि.धाराशिव येथे करण्यात आले होते. 

आयोजित केलेल्या कुस्ती क्रिडा स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने सहभाग नोंदवून कुस्ती क्रिडा प्रकारामध्ये यश संपादन केले.यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी मनिष शशिकांत माहिते (55 किलो वजनगट) व प्रेम राजेंद्र पवार(60 किलो वजन गटातून) अनुक्रमे दोघानी द्वितीय क्रमांक पटकावला.या सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल विजयी उमेदवाराचे पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव मा.शिवाजी (आप्पा) कापसे अध्यक्ष.श्री.श्याम (नाना) खबाले,उपाध्यक्ष प्रा.अविनाश मोरे,सहसचिव प्रा.संजय घुले व कोषाध्यक्ष श्री.बाळकृष्ण गुरसाळे  प्राचार्य डॉ.हनुमंत माने व प्रा.शिव खबाले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.प्रा.शिव खबाले यानी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.