राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मातृभूमीत महादेव खराटे यांचा गुणगौरव - kalayog

१० ऑक्टोबर, २०२५

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मातृभूमीत महादेव खराटे यांचा गुणगौरव


भोगजी: ता.कळंब येथे
 महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मातृभूमीत महादेव खराटे यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता .     

भोगजी- तालुका कळंब.

 जि.प.प्रा. शाळा भोगजी येथे आदर्श व उपक्रमशील शिक्षक, श्री.महादेव खराटे सर यांनी दाखवुन दिला...*महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचा शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार भोगजीचे सुपुत्र, सध्या आढाळा प्राथमिक शाळेतील  शिक्षक महादेव खराटे  यांना घोषित झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजी  व  ग्रामस्थ यांच्या वतीने महादेव खराटे यांचा यथोचित मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी  इटकुर बिटचे   शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी , भोगजी गावचे  सरपंच बालाजी आडसुळ,  मुख्याध्यापक श्री. राजेंद्र बिक्कड  , सेवानिवृत्त तुरुंग अधिकारी बाबुराव खराटे,  उपसरपंच बाबुराव खराटे ,स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शन चे अध्यक्ष रामेश्वर जाधवर, उद्योजक सुनील खराटे, इंजि. उमेश खराटे, बबलू मुंडे, उत्कर्ष आडसूळ, मनोहर सांगळे, सतिश खराटे, डॉ. गोरख मुंडे,सोनु खराटे ,चंद्रकांत खराटे, सुनंदा खराटे, प्रभावती खराटे, काशीबाई खराटे, सुलभा झेंडे उपस्थित होते.

   याप्रसंगी  श्री. महादेव खराटे  यांनी शालेय रंगरंगोटी साठी भोगजी शाळेस अकरा हजार रुपये (11000/-)  व शालेय ग्रंथालयासाठी 51 पुस्तके भेट दिली.   याच दातृत्वाने महादेव खराटे यांचे कर्तृत्व,  दातृत्व व नेतृत्व कसे तेजोमय आहे याचा प्रत्यय आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुख्याध्यापक  राजेंद्र बिक्कड  यांच्या अवहानास प्रतिसाद म्हणून गावचे सरपंच बालाजी आडसुळ यांनी शाळेस बारा खुर्च्या देण्याचे अभिवचन दिले.

   यथोचित सत्कारास उत्तर देताना सत्कारमुर्ती ,  शिवव्याख्याते, आदर्श शिक्षक         महादेव खराटे सर यांनी विविध महापुरुषांच्या  जीवनातील  प्रेरणादायी प्रसंगाचे वर्णन करुन मुलांना खेळते ठेवले.   शाळेतील विद्यार्थ्याना शाळेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले....

*विकासाच्या  पटलावरती कर्तव्याच्या पंखांनी झेप आकाशी घेऊ,  बालकांच्या सुप्त शक्तीनां गती  देऊ म्हणून कार्य करणारे  श्री.  महादेव खराटे सर यांच्या अध्यापनामुळे अनेक कोहिनूर हिऱ्यांना पैलु पाडण्यात आलेले आहेत.  सरांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा जो पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याबद्दल सरांचे मनपुर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यासाठी भोगजी शाळेच्या वतीने मनपुर्वक शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डॉ.शिवाजी चव्हाण, सहशिक्षक  कालिदास वनवे,परमेश्वर बोबडे  अनंत डोंगरे, मनोहर सांगळे ,बिभीषण मुंडे  दत्तात्रय जाधवर यांनी परिश्रम घेतले.