छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठी अभिजात भाषा सन्मान दिन साजरा - kalayog

४ ऑक्टोबर, २०२५

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठी अभिजात भाषा सन्मान दिन साजरा

 


कळंब : येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.03 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाविद्यालयात  कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले.यावेळी छ.शिवाजी महाराज, विष्णू वामन शिरवाडकर व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग (अण्णा) जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.हनुमंत माने हे होते. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.शफीक चौधरी हे उपस्थित होते.

    यावेळी प्रमुख अतिथी बोलताना म्हणाले की,केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला कारण शासनाच्या निकषानुसार मराठी भाषा ही परिपूर्ण संपन्न अशी भाषा आहे 'माझ्या मराठीचे बोलू काय कौतुक अमृतातही पैजा जिंके' असे मराठी भाषे विषयी बोलताना संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. याची जाणीव करून देत फादर स्टीफन्स यांनी तसेच कवीवर्य सुरेश भट्ट यांनीही मराठी भाषेची महंती सांगितले आहे. म्हणजेच मराठी भाषा कशी समृद्ध आहे ती मानवी जीवनात कशी उपयोगी आहे हे विविध संदर्भ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच अध्यक्ष समारोपात बोलताना प्राचार्य.डॉ. हनुमंत माने यांनी सांगितले की आधुनिक किंवा डिजिटल युगातही मराठी भाषेची समृद्ध अशी परंपरा टिकून आहे.मराठी भाषेत परकीय भाषेतील शब्द आलेले आहेत ते सर्व मान्य आहेत.भाषा ही प्रभावी असते ती जिवंत असते भाषेमुळेच मानवी जीवनाचा विकास होत असतो आपण स्वप्न सुद्धा भाषेतच पाहत असतो मराठी भाषेतील साहित्य हे मानवी जीवनाचे सर्वांगीण विश्लेषण करताना दिसते.समाजसुधारक, सामाजिक,आर्थिक,व भौतिक सर्व विचार संकल्पना मराठी भाषेतील साहित्यत आलेल्या आहेत या विषयीची विविध उदाहरणे देत त्यांनी अध्यक्ष समारोप केला. 

          कार्यक्रमाचे सुंदर संचालन प्रा.जाधवर शशिकांत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. उद्धव गंभीरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी आयक्युएसी चे प्रमुख प्रा.डॉ.अनिल जगताप  उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.