कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलग्नित व शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट्र संचालित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब,आयक्युएसी व रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी 'क्रांतीदर्शी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य.डॉ.हनुमंत माने,रासेयो विभाग प्रमुख डॉ.मनिषा कळसकर, आयक्युएसी समन्वयक डॉ.अनिल जगताप या मान्यवरांच्या हस्ते डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतीमेचे पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.