छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - kalayog

९ मे, २०२५

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 


कळंब : महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण, विभागीय मंडळ लातूर द्वारे घेण्यात आलेल्या फेबू/ मार्च 2025 च्या परिक्षेत छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
  महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत या वर्षी सुद्धा बारावी विज्ञान व कला शाखेचा उत्कृष्ठ निकाल मिळवला. यावेळी दोन्ही शाखांच्या १२ वीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शिवसेवा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट संस्थेचे सहसचिव प्रा.संजयजी घुले व प्राचार्य.शशिकांत जाधवर यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.इयत्ता बारावीत विज्ञान शाखेतील विद्यार्थी डोळस आर्यन देवीदास याने 71.00 टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयत प्रथम आला. द्वितीय कु.गायकवाड श्रृती कुमार हिने 64 टक्के गुण मिळविले व तृतीय क्रमांक 61.33 टक्के घेऊन कु.शिंदे पुजा विजय याने मिळविला तसेच कला शाखेतून 77.00 टक्के गुण प्राप्त करून गाडेकर संकेत दत्तात्रय याने प्रथम क्रमांक मिळविला.द्वितीय क्र.74.00 टक्के गुण प्राप्त करून कु.शेख मुस्कान हारून हिने मिळविला तर 72.50 टक्के गुण मिळवून कु.बाराते अस्मिता फुलचंद हिने तृतीय क्रमांक मिळविला.यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत पाल्यासोबत त्यांच्या पालकांचे सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.संजयजी घुले सरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमांचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी केले.सुत्र संचालन प्रा.राजाभाऊ चोरघडे याने केले प्रास्ताविक प्रा.नामदेव तोडकर यानी केले तर आभार प्रा.विजय घोळवे यानी मानले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अमोल शिंगटे प्रा.सोमनाथ कसबे प्रा. सुनिता चोंदे मॅडम प्रा.जोशी मॅडम प्रा.बाबू पवार प्रा.अमर खबाले प्रा.विनायक मिटकरी सुंदर कदम,दत्तात्रय गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.