ईटकुर प्रशालेत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार - kalayog

१ मे, २०२५

ईटकुर प्रशालेत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार

 


ईटकुर : एक मे महाराष्ट्र दिना दिवशी  जिल्हा परिषद प्रशाला ईटकुर तालुका कळंब शाळेमध्ये आठवी शिष्यवृत्ती व पाचवी शिष्यवृत्ती मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने क्वचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक एकमतचे आनंद दादा अडसूळ व सेवानिवृत्त शिक्षक श्रीधर गंभीरे उपस्थित होते त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले व उपाध्यक्ष बिभीषण देसाई हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे यांनी केले त्याचप्रमाणे प्रशाला मधील अनिल शिरसागर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी मार्गदर्शक मार्गदर्शन करणारे शिक्षक व आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वल्लभ होते यांनी केले