धाराशिव: जिल्हापरिषद धाराशिव शिक्षण विभाग यांच्या तर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना जिल्हा स्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले या वेळी पालकमंत्री मा.प्रताप सरनाईक,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,प्रवीण स्वामी जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक अशोक पाटील,सुधा साळुंखे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्रशाला इटकुर चे शिक्षक अनिल क्षीरसागर सर यांना प्रदान करण्यात आला.
