छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मुलींना कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन - kalayog

३ एप्रिल, २०२५

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मुलींना कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 

कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  छत्रपती संभाजीनगर संलग्नित, छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब गुरुवार दि.०३/०४/२०२४ रोजी  

 'कराटे प्रशिक्षण शिबीराचे'आयोजन करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचे उद्घाटन सुरुवातीला राजमाता जिजाऊं व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर व कराटे प्रशिक्षक प्रा.सोमनाथ कसबे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कराटे प्रशिक्षक प्रा.सोमनाथ कसबे यांनी महाविद्यालयातील मुलींना आपले संरक्षण करण्यासाठी कराटे याचा उपयोग कशा प्रकारे करता येऊ शकतो, या विषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थित मुलींना कराटेच्या विविध प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ युवती मंच व आयक्युएसी विभाग यांनी केले होते.यावेळी अनेक मुलींनी कराटे प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला.प्रास्ताविक डॉ. हनुमंत माने यांनी केले व आभार प्रा.विनायक मिटकरी यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिंनीसह एनएसएस कार्यक्रम अधिकारी  प्रा.मनिषा कळसकर तसेच डॉ.विद्युलता पवार,प्रा.सुनिता चोंदे आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ.अनिल जगताप,प्रा.शफीक चौधरी ,प्रा.अमोल शिंगटे,प्रा.बाबू पवार,प्रा. अमर खबाले प्रा. पंडित शिंदे प्रा डॉ.अनंत नरवडे प्रा. नामदेव तोडकर प्रा. डॉ.महावीर गायकवाड श्री.अशोक भोसले,श्री.सुंदर  कदम व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .