संगणकावरील आंतरजालाच्या साह्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर ट्रेंड च्या नावाखाली नेटकरी स्वतःच हसू करून घेताना सर्रास दिसून येत आहेत.सध्या सुरू असलेला Ghibali आर्ट चा बोलबाला कलाकाराच्या नजरेतून विनोदाचा विषय झाला आहे कारण Ghibali आर्ट मध्ये स्वतःचे चित्र कसे दिसते हे पाहण्याची उत्सुकता म्हणून जेव्हा ए आय चा वापर करून लोक चित्र बनवतात तेव्हा कुठेही मिळतं जुळतं नसणारे चित्र तयार होतं आणि हेच चित्र माझं आहे असं म्हणण्याची वेळ त्याच्यावर येते कारण ज्या फोटोचे Ghibali आर्ट केले आहे त्या शेजारी जर तो फोटो लावला नाही तर तयार झालेलेGhibali आर्ट हे त्याच व्यक्तीचे आहे असे कोणीही खात्रीशीर सांगू शकणार नाही. Ghibaliआर्ट च्या नादात आपले वैयक्तिक फोटो आपण धडाधड परकीय मीडियाच्या हातात देत आहोत काय खात्री नेमकी की आपल्या फोटोचा गैरवापर होणार नाही आपण आपला महत्त्वाचा डेटा कोणाच्यातरी हवाली करत आहोत त्याचा काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो ही शक्यता नाकरता येत नाही याचाच विचार करून आपण त्या मार्गावर जावे की नाही याचा विचार करणे गरजेचे आहे
१ एप्रिल, २०२५
Home
Unlabelled
Ghibli आर्ट च्या नादात करायला गेला गणपती झाला मारुती
Ghibli आर्ट च्या नादात करायला गेला गणपती झाला मारुती
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.
