छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाकडून स्वच्छता मोहिम संपन्न - kalayog

२१ जानेवारी, २०२५

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाकडून स्वच्छता मोहिम संपन्न



कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रासाठी युवक' विशेष वार्षिक रासेयो च्या शिबीरामध्ये मंगळवार दि. २१/०१/२०२५ रोजी  'स्वच्छता मोहिमेचे' आयोजन लोहटा (प.)येथे करण्यात आले होते.सकाळी या मोहिमेची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला व कचरा जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मनीषा कळसकर प्रा.अभिमान ढाणे प्रा.डॉ.अनंत नरवडे प्रा.सुनिता चोंदे प्रा.डॉ. विद्युलता पवार प्रा. विनायक मिटकरी प्रा. पंडित शिंदे डॉ.महेश पवार प्रा.अमोल शिंगटे प्रा.डॉ.अनिल जगताप प्रा.डॉ.उद्धव गंभीरे प्रा. डॉ.रघुनाथ घाडगे प्रा. शिव खबाले श्री.सुंदर कदम श्री मुरलीधर चोंदे श्री दत्तात्रय गायकवाड श्री दत्तात्रय कांबळे राष्ट्रीय सेवा योजना  विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी स्नेहल धावारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी श्रमदान केले दुपारच्या चर्चासत्रामध्ये डॉ.हनुमंत माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.शफिक चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. ढाणे अभिमान व आभार प्रा.मनिषा कळसकर यांनी मानले.यावेळी रासेयो चे स्वयंसेवक व विद्यार्थि व कर्मचारी उपस्थित होते.