कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रासाठी युवक' या विशेष सात दिवसांच्या वार्षिक शिबीराचे दि. १६/०१/२०२५ ते २२/०१/२०२५ या कालावधीत जि.प.प्रा.शाळा मौजे लोहटा(प.) ता.कळंब जि.धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्येविविध चर्चा सत्राचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात आले होते.दि.१७ जाने २०२५ रोजी 'डिजीटल साक्षरता व नवयुवक'या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्रचे प्रमुख वक्ते डॉ.अनिल जगताप हे होते. दि.१८जाने २०२५ रोजी 'बालविवाह प्रतिबंधक कायदा' या विषयावर डॉ.अर्चना मुखेडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'पर्यावरण संवर्धन काळाची गरज' या चर्चा सत्राचे आयोजन दि.१९ जाने २०२५ रोजी करण्यात आले होते.या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते डॉ.शिरमाळे एम.बी होते.दि.२०जाने २०२५ रोजी प्रा.डॉ.रघुनाथ घाडगे यांचे 'देशाच्या विकासात युवकांची भुमिका'या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.व दि.२१ जाने २०२५ रोजी 'शाश्वत शेती विकास व व्यवस्थापन' या विषयावर श्री.भुजंग लोकरे (कृषि सहाय्यक) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.या प्रमाणे स्वच्छाता ,जनजागृति रॅली अशा अनेक उपक्रमाचे आयोजन या विशेष शिबीरात करण्यात आले होते.
दि.२२ जानेवारी २०२५ बुधवार रोजी शिबिराचा समारोप संपन्न झाला.या शिबिरांची सुरूवात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.रघुनाथ घाडगे ( छ.शिवाजी महाविद्यालय कळंब) व श्रीमती.स्वातीताई आडसुळ,(सरपंच)श्रीमती.स्वाती साळुंके(ग्रामसेवक) प्राचार्य.शशिकांत जाधवर, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक मनिषा कळसकर व अभिमान ठाणे यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै.नरसिंग(आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आले.प्रमुख उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य.शशिकांत जाधवर व कार्यक्रमाधिकारी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. रघुनाथ घाडगे यानी रासेयो समारोप कार्यक्रमानिमित्ताने रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले आपण सर्वानी मिळून ग्राम विकासाला प्राधान्य दिले तर देश विकसित होईल.तसेच रोसेयो च्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे कार्य आपल्या श्रमातून होत असते.तसेच शिक्षणाचे महत्व व आदर्श समाज निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्राच्या विकासासाठी युवकांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच मा.गांधीजी खेड्याकडे चला असे का म्हणाले या संबंधीची पार्श्वभूमि या विषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच अंधश्रद्धा, बालविवाह,स्वच्छाता व शिक्षणांचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर,श्रीमती.स्वातीताई आडसुळ(सरपंच,लोहटा प.)श्रीमती.स्वाती साळुंके(ग्रामसेवक लोहटा प.)श्रीमती.संगीता अनपट(मुख्याध्यापक. जि.प.प्रा.शाळा लोहटा प.) श्री.गोविंद सावंत(रोजगार सेवक)पवार मॅडम,शिंदे मॅडम कार्यक्रमाधिकारी प्रा. मनिषा कळसकर,
प्रा.अभिमान ढाणे,प्रा.विनायक मिटकरी,प्रा.अमोल शिंगटे डॉ.महेश पवार,व रासेयो प्रतिनिधी कु.स्नेहल धावारे, कदम विश्वनाथ, हिंगे शिवप्रताप होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी केले.सुत्रसंचालन डॉ.मल्हारी शिंदे यानी केले.व आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.मनिषा कळसकर यानी मानले. यावेळी प्रा. डॉ.विद्युलता पवार ,प्रा. सुनीता चोंदे, प्रा. डॉ. अनंत नरवडे, प्रा. डॉ. अनिल जगताप, प्रा. डॉ. हनुमंत माने, प्रा. डॉ.
उद्धव गंभीरे, प्रा.शफिक चौधरी, प्रा. शिव खबाले, प्रा. सोमनाथ कसबे, श्री. अर्जुन घोगरे श्री. सुंदर कदम श्री. मुरलीधर चोंदे श्री. दत्ता कांबळे, श्री दत्तात्रय गायकवाड, श्री. विनोद तुपारे स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी व ग्रामस्थ उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
