छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रा.से.यो विशेष शिबीराचे उद्‌घाटन संपन्न - kalayog

१७ जानेवारी, २०२५

छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रा.से.यो विशेष शिबीराचे उद्‌घाटन संपन्न

 


कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रासाठी युवा' या विशेष वार्षिक शिबीराचे दि. १६/०१/२०२५ ते २२/०१/२०२५ या कालावधीत जि.प.प्रा.शाळा लोहटा (प.)ता.कळंब जि. धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबीराचे उदघाटन गुरुवार दि.१६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठिक ११.३० वा. उद्घाटन मोठ्या उत्साहाने सम्पन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्राचार्य. डॉ.हरिदास फेरे( वसंतराव काळे कला महाविद्यालय ढोकी) मा. सौ.स्वाती आडसूळ (सरपंच लोहटा प.) मा.रविकांत पवार (उपसरपंच) श्रीमती संगीता अनपट(मुख्याध्यापक जी.प.प्रा शाळा  लोहटा प.) श्री.सोमनाथ सावंत (ग्रा. स.) प्राचार्य.शशिकांत जाधवर व रा.से.यो विद्यार्थी प्रतिनिधी कु. स्नेहल धावारे  यांच्या हस्ते प्रथमतः छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग(आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलीत करून करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख मान्यवरांमध्ये मा. सौ.स्वाती संजय आडसूळ(सरपंच लोहटा प.) मा.रविकांत पवार(उपसरपंच लोहटा प.)  श्री.संजय आडसुळ, श्री. सोमनाथ सावंत श्री.लिमकर सर, श्री.कोठावळे सर, श्री. टिळे सर, श्री. शिंदे सर, डॉ.महेश पवार,प्रा.अमोल शिंगटे,प्रा.विनायक मिटकरी व प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य,डॉ हरिदास फेरे  प्राचार्य.शशिकांत जाधवर,कार्यक्रमाधिकारी प्रा.मनिषा कळसकर, प्रा.अभिमान ढाणे कु. स्नेहल धावारे (एन.एस.एस. विद्यार्थी प्रतिनिधी) तांबोळी मॅडम हे उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.हरिदास फेरे यानी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्देश व रा.से.यो चे स्वयंसेवक यांच्या कार्या विषयी, राष्ट्रासाठी युवकाची भूमिका तसेच रासेयो च्या माध्यमातून राष्ट्र घडविण्यासाठी युवकांची भूमिका तसेच आई वडिलांच्या कष्ठाची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.यावेळी त्यानी विद्यार्थ्यांना आई वडीलाना सन्मान मिळवून देण्यासाठी आपण शिकून मोठे व्हावे असे आव्हान  केले.तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अभिमान ढाणे व अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शाशिकांत जाधवर यानी केले. सुत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यानी केले.आभार डॉ.हनुमंत माने यानी मानले.यावेळी डॉ. विद्युलता पवार मॅडम प्रा. सुनीता चोंदे मॅडम , प्रा.डॉ. अनंत नरवडे, प्रा. डॉ. अनिल जगताप ,डॉ रघुनाथ घाडगे, डॉ. उद्धव गंभीरे ,डॉ.महावीर गायकवाड, प्रा. पंडित शिंदे, प्रा.बाबू पवार ,प्रा. खबाले सर , श्री .अर्जुन घोगरे, श्री. सुंदर कदम ,श्री. विनोद तुपारे श्री मुरलीधर चोंदे श्री दत्तात्रय गायकवाड श्री. दत्तात्रय कांबळे, श्री. अशोक भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.