ढोकी : मा. पोलीस अधीक्षक, श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक, श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक- सारफळे यांनी दि.16.01.2025 रोजी जिल्हा परिषद शाळा ढोकी ता. जि. धाराशिव येथे भेट देवून ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ योजना अंतर्गत शाळेतील मुलांना घरातील थोर मंडळी तुम्हाला दैनंदिन कामासाठी लावत असेल तर तुम्ही वय 18 वर्षे पुर्ण होई पर्यंत कामाला जाण्याची शासन मान्यता देत नाहीत तसे जर झाले तर तो कायद्याने गुन्हा आहे. तसेच अल्पवयीन मुलांचे वय 18 वर्षे पुर्ण झालेले नसताना व वाहन चालविणे चा परवाना नसतानाही वाहने चालवतात. व तुमचे पालक तुम्हाला वाहन चालविण्यास देतात ही बाब संपुर्ण पणे बेजबाबदार पणाची व बेकायदेशीर आहे. अल्पवयीन मुलांनी वहातुक नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांना किंवा वाहन मालकांना दोषी धरले जाणार आहे व त्याच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा, ज्युनेनाईल जस्टीस ॲक्ट अशा विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येईल. अल्पवयीन मुलांनी 50 CC पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविल्यास त्यासाठी आकारण्यात येणारा दंड 25,000₹ आहे तसेच मालक व पालकांना 3 वर्षे पर्यन्त सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतुद आहे तसेच अपघात झाल्यास इन्शुरन्स कंपनी कडुन क्लेम नाकारला जातो व वयाच्या 25 वर्षे पर्यन्त संबंधित मुलांना वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही व वाहन नोदंणी रद्द होते व नौकरी, पापोर्ट मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. तरी मुलांनी वाहन चालवून स्वत:हा चा व दुसऱ्याचा जिव धोक्यात घालु नका वाहना ऐवजी सायकल, ईसायकल चा पर्याय उपलब्ध असुन जे सोईस्कर व सुरक्षित आहे. तसेच सायबर गुन्हे बाबत मार्गदर्शन केले.