मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम लाभ घेण्याचे आवाहन - kalayog

१४ जानेवारी, २०२५

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम लाभ घेण्याचे आवाहन

 

 


 

धाराशिव दि.१४ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना आहे.या योजने‌द्वारे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात येते.उत्पादन उ‌द्योगासाठी ५० लाख व सेवा उ‌द्योगासाठी २० लाखापर्यंत कर्जमर्यादा आहे.

या योजनेअंतर्गत पुरुषांसाठी १५ टक्के ते २५ टक्केपर्यंत व महिलांसाठी २५ टक्के ते ३५ टक्केपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्हा उ‌द्योग केंद्रास ८०० कर्ज प्रस्तावांचे उ‌द्दिष्ट प्राप्त झाले आहे.  

तरी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. जिल्ह्यातील सर्व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उ‌द्योग केंद्र धाराशिव येथे संपर्क साधावा.असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उ‌द्योग केंद्र, धाराशिव यांनी केले  आहे.