लेखक व विद्यार्थी वाचन संवाद कार्यक्रम संपन्न - kalayog

१३ जानेवारी, २०२५

लेखक व विद्यार्थी वाचन संवाद कार्यक्रम संपन्न

 

कळंब : कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर यांचे आदेशानुसार  महाविद्यालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचन संस्कृती विकसित व्हावी या हेतूने दि.13/01/2025 रोजी महाविद्यालयांमध्ये 'लेखक व विद्यार्थी वाचन संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य.शशिकांत जाधवर व प्रमुख वक्ते श्री.आश्रुबा कोठावळे (कवि व बालसाहित्यकार) यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमाचे पूजन करून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयातील ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ.विद्युलता पवार मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.हनुमंत माने हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.शफीक चौधरी तसेच इंग्रजी विभाग व आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल जगताप तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा.मनीषा कळसकर मॅडम उपस्थित होते.यावेळी प्रमुख वक्ते श्री.आश्रुबा कवठाळे यानी वाचन व त्याचे होणारे फायदे तसेच वाचनामुळे विद्यार्थ्यांन मध्ये शब्द भंडार वाढतो व तो लेखनाकडे वळतो वाचनाने व्यक्ति तणाव मुक्त होतो. तसेच वाचनाने स्मरणशक्ती वृद्धिगत होते.तसेच विद्यार्थी हा वाचन संस्कृती पासून दूर जाता कामा नये.याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात श्री.कवठाळे यानी त्यांच्या कविता व गजल स्वःतच्या सुंदर आवाजात प्रस्तुत केल्या.त्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन दररोज केले पाहिजे असे आव्हान केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शशिकांत जाधवर यांनी केले.सुत्रसंचालन डॉ.हनुमंत माने यानी केले व आभार डॉ.अनिल जगताप यानी मानले.यावेळी सभागृहात प्रा.सुनिता चोंदे मॅडम डॉ.अनंत नरवडे प्रा.पंडित शिंदे मुरलीधर चोंदे दत्ता गायकवाड सुंदर कदम महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.