छत्रपती शिवाजी महाविद्यालयात माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी - kalayog

११ जानेवारी, २०२५

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 


कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती तसेच युवा दिनानिमित्त दि.12/01/2025रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे सहसचिव प्रा.संजयजी घुले व आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ. अनिल जगताप या मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.रघुनाथ घाडगे विठ्ठल फावडे जयसिंग चौधरी सुंदर कदम व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनींनी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.