कळंब : येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर , उपकुलसचिव , शैक्षणिक विभाग यांच्या सूचनेनुसार मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी , मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा तसेच तिचे संवर्धन व्हावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात १४ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले.यामध्ये विद्यार्थ्यांचे कविसंमेलन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि पुस्तक परीक्षण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विद्यार्थी कविसंमेलनात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आवडीच्या पुस्तकाचा आस्वाद घेऊन त्यावर सुंदर परीक्षणे लिहिली. या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, जाधवर एस.एस., मराठी विभाग प्रमुख ,डॉ . हनुमंत माने,आयक्युऐशी समन्वयक प्रा.डाॅ.अनिल जगताप, हिंदी विभाग प्रमुख,प्रा.शफिक चौधरी तसेच ग्रंथपाल डॉ.विद्युलता पवार मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
