कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो /आयक्युएसी विभाग तसेच इनरव्हिल क्लब कळंब आयोजित व इंडियन मेडिकल असोसिएशन,बाल आरोग्य परिषद,स्त्री आरोग्य परिषद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.07/02/2025 शुक्रवार रोजी 'एच पी व्ही लसीकरण जनजागृति अभियान ' या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्याचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कै.नरसिंग(आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवरांचे शाल पुष्प गुच्छा देऊन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रियंका जाधवर यानी महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरच्या समस्या व हे आजार का निर्माण होतात,या पासून होणाऱ्या अनेक समस्या यापासून एच पी व्ही या लसी च्या माध्यमातून या भयानक कॅन्सरच्या आजारावर कश्या प्रकारे आपण मात करू शकतो.या विषयावर जनजागृति करताना मोलाचे व सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख उपस्थितीत प्राचार्य.शशिकांत जाधवर डॉ.प्रियंका जाधवर (प्रमुख मार्गदर्शक) सौ.ज्योती पवार,सौ.राजश्री देशमुख,सौ.संगीता घुले ,लोंढे मॅडम,नाईकनवरे मॅडम सौ.निशा कळंबकर,शिंदे सर रासेयो विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.मनिषा कळसकर,प्रा. अभिमान ढाणे व डॉ.विद्युलता पवार या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्राचार्य.शशिकांत जाधवर यांनी बदलती जीवनशैली व आहारविहार या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.राजश्री देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य शशिकांत जाधवर व सुत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यानी केले. आभार डॉ.हनुमंत माने यानी मानले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
