इनरव्हिल क्लब कळंबच्या वतीने शिक्षकांचा सन्मान - kalayog

५ सप्टेंबर, २०२४

इनरव्हिल क्लब कळंबच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

 

कळंब:-दि.५ सप्टेंबर शिक्षक दीन व मा.राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतनिमित्त इनरव्हिल क्लब कळंबच्या वतीने  कळंब शहरातील समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे सुलभामॅडम,जि.प.कन्या  व बाॅईज शाळेचे मु.अ.अन्सारीसर, श्रीमती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा चे मु.अ.जाधव सर, शाहिद भगतसिंग विद्यानिकेतन चे मु.अ.श्री.शेळके सर,नगरपालिका शाळेच्या मु.अ.श्रीमती पायाळ मॅडम,विद्याभवन हायस्कूल चे मु.अ. श्री पवार सर सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचा शिक्षक दिना निमित्त शहरातील  शाळांमधील गुरूजनांचा व इनरव्हिल क्लब कळंबमधील सर्व शिक्षिकांचा इनरव्हिल क्लब कळंबच्या अध्यक्षा सौ प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे) व सेक्रेटरी डॉ प्रियंका धनंजय आडमुठे यांनी शुभेच्छा व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

       हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रोजेक्ट चेअरमन सौ.राजश्री देशमुख यांनी काम पाहिले.यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबच्या उपप्राचार्या तथा इनरव्हिल क्लब कळंबच्या  माजी अध्यक्षा डॉ.मिनाक्षी शिंदे (भवर), सदस्या प्रा.सुमन विटकरी, सदस्या प्रा.संगिता शेळके, डॉ . दिपाली लोंढे, सौ.रेखा तिर्थकर,सौ.नंदा अनिगुंठे यांनी सहकार्य केले .