यावेळी राज्य सरचिटणीस मा.भक्तराज दिवाणे , विठ्ठल माने गणेश कोठावळे, तालुकाध्यक्ष मा.प्रशांत घुटे , तालुका संघटक अमोल बाभळे , तालुका चिटणीस संतोष लिमकर , कोषाध्यक्ष प्रशांत निन्हाळ , विवेकानंद मिटकरी , नगर परिषद शिक्षक संघाचे अविनाश खरडकर, नारायण बाकले ऋषीकुमार साबळे, महादेव खराटे, सुनिल बोरकर, अनिल शिंदे, सचिन भांडे, मुकुंद नांगरे, संजय तांबारे, पांडुरंग गंभीरे, दिलीप पाटील, दीपक चाळक, बालासाहेब चौधरी, राजेश ढेंगळे, अशोक डिकले, राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे शिवराज मेनकुदळे, नवनाथ तुंदारे, संतोष ठोंबरे, आप्पासाहेब शेळके,महादेव मेनकुदळे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते....
कळंब : दी.9 कळंब येथे तहसिल कार्यालय समोर दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजीचे अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली अन्यायकारक शासन निर्णयांची होळी करण्यात आली व तहसीलदार कळंब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री व मा.शिक्षणमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 15 मार्च 2024 व .. या शासन निर्णयानुसार राज्यातील जवळपास 15000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. तसेच गोरगरीबांच्या पोरांना यापुढे शिक्षण मिळणेच अवघड होणार आहे. याचप्रमाणे बेरोजगार डीएड बीएड धारकांची भरती न करता कंत्राटी पद्धतीने अल्प मानधनात धोरण राबविण्यात येत आहे त्या विरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.बाळकृष्ण तांबारे यांनी केले आहे...

