महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय बालचित्रकला स्पर्धा च्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा कळंब येथे दिनांक 13 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त पोषक वातावरण निर्माण व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची वाढावी म्हणून बाल चित्रकला स्पर्धेमध्ये विविधता आणून आकर्षण निर्माण व्हावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा या दृष्टिकोनातून काही आवश्यक बदल करून तालुकास्तरावर बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, यात एकूण 18 शाळा व 421विद्यार्थी सहभागी झाले होते चार गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
१ला गट ७ वर्षा पर्यंत ,२रा गट - ७ ते ९ वर्ष ,३ रा गट -९ ते १२ वर्ष ,४था गट - १ २ ते १६ वर्ष
विषय
1) गट पहिला
असा असावा माझा बगीचा
माझा मित्र किंवा मैत्रीण वाढदिवस
भातूकली चा खेळ खेळणारी मुले
2) गट दुसरा
माझा आवडता ऋतू
घरातील मौज मस्ती
मी पाहिलेली सर्कस
3) गट तिसरा
गडावरील सहल
बूट पॉलिश करणारा चांभार
मी व मित्रांनी शोधलेला खजिना
4) गट चौथा
भारतीय सण
शेतात काम करणारे आई वडील व मुले
खेळण्याच्या दुकानातील प्रसंग
असे विषय देण्यात आले होते.विषयवार चित्र काढण्यात विद्यार्थी दंग होवून गेले होते
गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांचे मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धेचे समन्वयक म्हणून दिनेश वाघमारे सर चित्रकला शिक्षक जि प प्रा शाला मुलांची कळंब व शरद आडसुळ चित्रकला शिक्षक जि प प्रा शाळा ईटकुर यांनी काम पाहिले. तर यावेळी महादेव खराटे प्रशांत घुटे, खय्युम फकीर, मला शिक्षक सुचिता गुंजाळ, इंटरनॅशनल चे कला शिक्षक प्रशांत भोले, प्रशाला कळंबचे कार्यानुभव शिक्षक बब्रुवान तांबारे माध्यमिक शिक्षक अशोक शिंपले, अर्चना घुटे मॉडेल इंग्लिश स्कूल प्राचार्य लता यंदे, माधव कुलकर्णी शुभांगी पालकर सारिका चव्हाण आदी शिक्षक उपस्थित होते.