कळंब: छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ.एस .आर.रंगनाथन यांची जयंती प्राचार्य शशिकांत जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख ग्रंथपाल प्रा. डॉ. विद्युलता पवार यांच्या नियोजनाखाली साजरी करण्यात आली याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शशिकांत जाधवर यांनी तरुण पिढी वाचनाकडे वळावी व आलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढील काळात टिकायचे असेल तर वाचेल तो टिकेल अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविक भाषणात प्रा. डॉ.अनिल जगताप यांनी ग्रंथालय हे ज्ञानाची गंगोत्री आहे व या ज्ञान गंगोत्रीचा उपयोग किती व कसा घ्यायचा हे वापरण्या वर अवलंबून असते,असे ते म्हणाले. ग्रंथपाल डॉ. विद्युलता पवार यांनी ग्रंथालयाचा वापर व विद्यार्थ्यांची वाचनाप्रती असलेली आवड यावर सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात व्यतीत करून आपल्या ज्ञानसाठ्यात वाढ केली पाहिजे असे म्हणाल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल शिंगटे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
