ईटकुर: जि. प. प्रशाला इटकूर मध्ये ७८वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये प्रभातफेरी नंतर ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर विद्यार्थ्यांची उस्फूर्त भाषणे, देशभक्तीपर नृत्य, गतवर्षीच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले तर प्रमुख पाहुणे म्हणून इटकूर येथील स्वातंत्र्यसैनिक सर्जेराव पाटील, सरपंच मोहरताई कस्पटे, ग्रामपंचायत सदस्य आशाताई पावले, रेखाताई शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बिभीषण देसाई, विनोद गाडे, बिभीषण देसाई, संजय आरकडे, हनुमंत कस्पटे, पोस्ट ऑफिस अधिकारी श्वेता ताकपिरे, माजी शिक्षक तुकाराम शिंदे, अभिषेक गुजर, राहुल आडसूळ, माजी सैनिक बाळासाहेब गंभीरे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल क्षिरसागर यांनी केले तर आभार गणेश कोठावळे यांनी मानले.
