ईटकूर ; जि.प.प्रा शाळा गंभीरवाडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद आडसूळ, ग्रामपंचायत सरपंच शिवाजी गोडगे, ग्रामविकास अधिकारी लांडगे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने , तंटामुक्तीचे अध्यक्ष विष्णू नव्हाट, समितीचे माजी अध्यक्ष बालाजी गोडगे, माजी सरपंच पंडित गोडगे, सुरज गंभीरे, गोरखजी देवकर, सुंदर गोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धा, गंभीरवाडी रत्न स्पर्धा, एनएसएसई ,मंथन आणि विनर या परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच विशेष भाग म्हणजे इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक कुमारी कार्तिकी पांडुरंग टेळे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थ्यांना सुरज गंभीरे याच्या तर्फे स्कूल देण्यात आल्या. राष्ट्रीय नेत्यांचे फोटो अशोक गोरख देवकर यांच्यामार्फत शाळेस भेट देण्यात आले. तसेच रोख प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून विष्णूजी नव्हाट विठ्ठल माने यांनी दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेळे पी. पी यांनी प्रस्ताविक मोरे एच. आर यांनी व आभार प्रदर्शन सरवदे पी. एल यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मोरे, श्रीमती डांगे एम. पी व श्रीमती भंडारे यांचे सहकार्य लाभले.
