प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये फिनीक्स इंग्लिश स्कूल पाथरूड शाळेची धमाकेदार कामगिरी - kalayog

५ एप्रिल, २०२४

प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये फिनीक्स इंग्लिश स्कूल पाथरूड शाळेची धमाकेदार कामगिरी

 

   भूम: प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परीक्षांमध्ये फिनिक्स इंग्लिश स्कूल पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .
     यामध्ये इयत्ता चौथी - मध्ये ध्रुविका बोराडे 240 गुण जिल्ह्यातून नववी ,इयत्ता दुसरी -शिव बोराडे १७० गुण जिल्ह्यातून आठवा, शिवदीप बोराडे व स्वराज साळुंखे 168 गुण जिल्ह्यातून दहावा , श्रेया शेजाळ 160 गुण तालुक्यातून चौथी , इयत्ता पहिली -
सार्थक भोसले व सत्यजित वाघ 172 गुण जिल्ह्यातून आठवे ,राजनंदिनी पिंपळे 162 गुण तालुक्यातून दुसरी ,मयुरी चकोर 158 गुण तालुक्यातून चौथी, करण तिकटे व आरव वनवे 156 गुण तालुक्यातून पाचवे .
 वरील विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुक्यात तालुक्यामध्ये घवघवीत यश मिळवले . तसेच परीक्षेत बसलेले 40 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे .
शाळेच्या वतीने वरील मुलांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन , हे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे मुख्याध्यापक खांडेकर बापू , वैशाली टाळके , भाग्यश्री कांबळे , खुणे अर्चना , स्वप्नाली टाळके , सोनाली खुणे , करडे लता ,पुनम बोराडे , प्रिती पन्हाळे 'कांबळे दिपाली या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . विशेषत: म्हणजे वर्गशिक्षक व पालक  सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हे यश मिळाले असल्याचे मुख्याध्यापक खांडेकर यांनी सांगितले.या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.