पुणे: दि.25 रोजी
बालगंधर्व कलादालन पुणे येथे विविध शालेय विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षकांचे चित्रप्रदर्शन आयोजन करण्यात आले होते
सदर शैक्षणिक वर्ष 2023 -24 या वर्षामध्ये कलादर्पण अकॅडमी तर्फे राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे . या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे . या स्पर्धेमध्ये प्रथम स्तरावरती सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 52,762 असून सहभाग नोंदवल्यापैकी 15600 विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले व द्वितीय स्तरावरती 15600 विद्यार्थ्यापैकी 1500 विद्यार्थ्यांची बालगंधर्व कलादालनामध्ये चित्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली होती. निवड केलेल्या 1500 विद्यार्थ्यांपैकी 722 विद्यार्थ्यांचे प्रदर्शन व बक्षीस वितरण दिनांक: 24 मार्च 2024 रोजी सन्मान करण्यात आला.
तसेच मा. श्री सुधाकर चव्हाण (ज्येष्ठ चित्रकार) “आदर्श कला शिक्षक पुरस्कार” 2023-24”
मा. श्री जयप्रकाश जगताप ज्येष्ठ चित्रकार यांना “कलादर्पण जीवन गौरव पुरस्कार” 2023-24 ज्येष्ठ चित्रकार
संस्थेतर्फे मा. अध्यक्षा सौ. पल्लवी घोडके व सौ संगीता (नानी) ताम्हाणे (मा. नगरसेविका पिं चिं महानगरपालिका) यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री एकबाल अत्तार (मुख्याध्यापक भीमाशंकर विद्यालय टाका) यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी गोविंद घोडके यांनी केला तसेच प्रमुख पाहुणे मा श्री प्रभाकर पाटील (माजी विश्वस्त विद्यार्थी साहाय्यक समिती पुणे) मा श्री भारत सिंग राठोड अध्यक्ष जय अंबिका आश्रम शाळा मा श्री मुरली लाहोटी (ज्येष्ठ चित्रकार) मा श्री सुरेश लोणकर (ज्येष्ठ चित्रकार) उमाताई राठोड, मा. श्री देशमुख (बोलक्या रेषा) मा. श्री सोमनाथ बोटे (आयोध्या राम मंदिर पेंटिंग फेम ) मा. श्री सुरेश लोणकर (ज्येष्ठ चित्रकार), पुण्यातील नामवंत चित्रकार या कार्यक्रमास उपस्थित होते.
पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष यांनी केला तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व विविध शाळेतील कलाशिक्षक यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व तसेच बाळू गायकवाड (सहाय्यक व्यवस्थापक बालगंधर्व पुणे) यांचाही सत्कार संस्थेच्या अध्यक्ष यांनी केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चिंगाटे दिनेश व सौ सुनिता चिंगाटे यांनी केले व श्री दिलीप पटने सर (जय अंबिका प्राथमिक आश्रम शाळेचे शिक्षक) यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले
