खुद्द ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनाही अचंबीत करणारे प्रा. महादेव गपाट यांचे सूत्रसंचलन........ - kalayog

८ एप्रिल, २०२४

खुद्द ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनाही अचंबीत करणारे प्रा. महादेव गपाट यांचे सूत्रसंचलन........

खुद्द ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनाही अचंबीत करणारे  प्रा. महादेव गपाट यांचे सूत्रसंचलन........=================सबनीस सरांनी सत्कार केल्यावर डोळ्यात पाणी..... सभागृह भाऊक
=================कला ही माणसाला जिवंत ठेवत असते .आणि हे खरेच आहे. नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुणांनी आपल्या अंगातील कलागुणांना गावकुसाबाहेर  काढल्यानेच ते समाजात प्रतिष्ठित म्हणून जगू लागले आहेत व यशस्वी ही झाले आहेत. सूत्रसंचालन, वक्तृत्व ही सुद्धा एक अवघड कला आहे. व्यासपीठावरचे पाहुणे व उपस्थित यांच्या मधला दुवा म्हणून सूत्रसंचालन करणारे काम करत असतात. सूत्रसंचालन करणाऱ्याला अभ्यास व  पाठांतराची गरज असते. तरच तो यात यशस्वी होतो व कौतुकास पात्रही ठरतो.         गेली बारा वर्षे बिन पगारी शिकवणारा प्रा .महादेव गपाट हा सध्या आघाडीचा सूत्रसंचालक होऊ पाहतो आहे . कोणत्या हि कार्यक्रमात आपल्या मधाळ वाणीने पाहुणे  व उपस्थितांची  मनी जिंकतो आहे. मराठी भाषेचे अफाट ज्ञान असणाऱ्या महादेव च्या जिभेवर सरस्वती  रेंगाळती  की काय असे क्षणभर वाटते. ज्या ज्या कार्यक्रमात प्रा. महादेवने संचलन केले तेथे कौतुकच झाले.     कळंब येथे परमेश्वर पालकर लिखित प्रतीक्षा जगण्याची या कवितासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक समीक्षक श्रीपाल सबनीस, शरद गोरे आदि मान्यवरांच्या हस्ते झाले. दोन अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रा. महादेव गपाट यांनी प्रसिद्ध कवींच्या कवितेची जोड देऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या भाषणाचा सार काही मिनिटात सांगून खुद्द सबनीस सरांनाही अचंबित  केले. विनाअनुदानित कॉलेजवर काम करणाऱ्या प्रा .महादेव गपाट  यांच्या बुद्धीला सलाम करून त्यांच्या सत्काराची शाल व हार घालून या तरुणाचा श्री सबनीस सर यांनी सत्कार केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला हे सर्व पाहून गपाट सरांच्या डोळ्यातून आनंद अश्रू  आले. आणि सभागृह हि भाऊक झाले.    या वेळी प्रसिद्ध चित्रकार जयवंत तांबारे यांनी हि अनेक वर्ष कला साधना केली.घरची परिस्थिती बेताचीच,  असल्याने केल्या शिवाय गतंत्यार नव्हते,मागास या शब्दाने त्यांना खूप छळले  व आज ही त्रास सहन करावा लागत आहे.आपल्या भाषणात त्यांनी  जुन्या आठवणींना उजाळा देत भाऊक झाल्याने, उपस्थितीच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या .     कोणतीही क्रांती करताना ती झोपडीतून व  उपाशी पोटीच होत असते. हे गपाट सर व  जयवंत तांबारे यांच्या वरून सिद्ध होते.    या तरुणांनी बारा वर्ष बिन पगारी काम केले व आजही करत आहेत.  शिक्षकाने किती अभ्यास करावा व कसा करावा हे त्यांच्या ,वक्तृत्व शैलीतून दिसून येते. यांचा आदर्श ज्ञानअर्जन करणार्या मंडळींनी  घ्यावा असेच वाटते.......
==============साहित्यिक,पत्रकार श्री.सतीश (बप्पा)टोणगे  यांच्या लेखणीतून.साभार 9422936081