धाराशिव कला अध्यापक संघाची विविध प्रश्नावर चर्चा बैठक संपन्न - kalayog

६ जानेवारी, २०२४

धाराशिव कला अध्यापक संघाची विविध प्रश्नावर चर्चा बैठक संपन्न

धाराशिव: दिनांक 6 जानेवारी कला अध्यापक संघ धाराशिव च्या वतीने आयोजित बैठकीत अंशकालीन कला, कार्यानुभव व क्रिडा निदेशक यांना आमंत्रित केले होते. पुढील काळात जिल्हा दौऱ्यावर माननीय पालकमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना कला , क्रिडा व कार्यानुभव अंशकालीन
निदेशकांच्या नियुक्ती व सेवा सातत्यावर निवेदन सादर करणे व माननीय शिक्षक आमदार , पदवीधर आमदार , जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय तसेच खासदार महोदय यांना निवेदन व अंशकालीन निदेशकांच्या प्रश्नाविषयी पाठपुरावा  करण्यावर भर देणे, याविषयी आजच्या बैठकीत चर्चा झाली. सदर न्याय्य मागणी करीता धरणे आंदोलन , उपोषण आंदोलन आदी मार्गाचा   अवलंब करावा लागला तरी जिल्ह्यातील सर्व कलाध्यापक , सर्व अंशकालीन निदेशक बांधव   मोठ्या धैर्याने सामोरे जातील असे सर्वानूमते बैठकीत ठरले.
धाराशिव जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळावर कलाध्यापक कार्यरत असून त्यांना संघटनेबरोबर प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच जिल्ह्यात कलेच्या दृष्टिकोनातून वातावरण निर्मिती होण्याकरीता सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे  व पुढील काळात कलाध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्याकरीता शासन स्तरावर शर्तीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे आदी विषयावर आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .या बैठकीसाठी जिल्हा कलाध्यापक संघाचे पदाधिकारी जिल्हा सचिव श्री वाघ एस डी सर, जिल्हाध्यक्ष श्री नानासाहेब बोराडे सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री शिवाजीराव भोसले सर, सहसचिव साहेबराव गांगुर्डे सर,श्री अरूण जाधव सर, श्री अभिनंदन आकाडे सर, श्री कला निदेशक रवि तिगाडे सर, दिनेश वाघमारे सर,शरद आडसूळ सर, ए.आर.कुटे सर , अफजल शेख सर आदी कला निदेशक बांधव उपस्थित होते.