आज दि.8/1/2024 वार सोमवार रोजी संजीवनी विद्यालय, चिलवडी ता.धाराशिव येथे विद्यालयात इ.5 वी ते 10वी शिक्षण घेतलेला माजी विद्यार्थी कु.विठ्ठल विनायक तांबे हा *महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत* घेण्यात आलेल्या परीक्षेत *STI* (विक्री कर निरीक्षक) पदी नियुक्ती मिळाल्या बद्दल विद्यालयात *सत्कार समारंभ* आयोजित केला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.के.वाय.जाधव सर, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भोसले हायस्कूल, उस्मानाबाद चे मा.पर्यवेक्षक श्री .जाधव बी.जी. सर , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.मान्यवरांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते मा.विद्यार्थी विठ्ठल तांबे यांचा शाल,श्रीफळ व पेढे भरवून सत्कार करण्यात आला , यानंतर यशस्वी विद्यार्थी विठ्ठल ने सर्व मुलांना प्रेरणादायक भाषण केले.मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय भाषण झाले यावेळी विद्यालयतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.आभार शिंदे बी.जे.सर यांनी मानले तर सुत्रसंचलन बोराडे सर यांनी केले.
८ जानेवारी, २०२४
Home
Unlabelled
विक्री कर निरीक्षक पदी नियुक्ती मिळाल्या बद्दल संजीवनी विद्यालयात सत्कार
विक्री कर निरीक्षक पदी नियुक्ती मिळाल्या बद्दल संजीवनी विद्यालयात सत्कार
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.