कळंब - वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनानिमित्त भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा पुष्पहार व पुषगुच्छ देवून सत्कार केला.
याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक अविनाश म्हैत्रे,निदेशक विनोद जाधव,निदेशक सागर पालके,आदित्य गायकवाड,विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर कवडे व आभार विक्रांत देशमाने ह्या विद्यार्थ्यांनी मानले.
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.