कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 05 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.बाळकृष्ण गुरसाळे व सहसचिव प्रा.संजयजी घुले या मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष श्री.रवी नारकर,माजी अध्यक्ष धर्मेश शहा,डॉ.अमित पाटील व डॉ.शैलेश बिदादा यानी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधूचे गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील रासेयो विभाग प्रमुख प्रा.ज्योतीराम जाधव,प्रा.मनिषा कळसकर मॅडम व आयक्युएसी विभाग प्रा.अनिल जगताप उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ. विद्युलता पवार मॅडम,प्रा. सुनिता चोंदे मॅडम डॉ.हनुमंत माने,प्रा.विनायक मिटकरी डॉ.अनंत नरवडे, प्रा.पंडित शिंदे,डॉ.उद्धव गंभिरे, डॉ.घाडगे, प्रा शफीक चौधरी,प्रा.शिव खबाले प्रा.शिंगटे,प्रा.महेश पवार डॉ.महावीर गायकवाड डॉ.हंडीबाग प्रा.अमर खबाले प्रा.ढहाणे प्रा.तोडकर प्रा.चोरघडे प्रा.घोळवे प्रा.कसबे श्री.फावडे,शेंडगे,जयसिंग चौधरी, मॅडम,काका चोंदे,सुंदर कदम,अशोक भोसले दत्तात्रय गायकवाड,दत्ता कांबळे यांच्यासह शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
६ सप्टेंबर, २०२३
Home
Unlabelled
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.