कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.04/09/2023 सोमवार रोजी ' नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020' संबंधी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम सत्राच्या कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख मार्गदर्शक डॉ.दिपक ननावरे(दयानंद कॉमर्स कॉलेज,सोलापूर) प्रा.सिद्धार्थ गायकवाड प्राचार्य.शशिकांत जाधवर व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच मान्यवरांचे प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.दिपक ननावरे यानी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे न्यु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही देशात 2020 पासून लागू करण्यात आली आहे.हळूहळू या पॉलिसी अंतर्गत शिक्षण संदर्भातील काही नियम आणि अटी लागू करण्यात येत आहे.तसेच काही महत्त्वाचे बदलही करण्यात येत आहे.बदलेले हे नियम व नविन पद्धती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.तसेच द्वितिय सत्रात डॉ.दिपक ननावरे यानी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे नविन शैक्षणिक धोरणा संबंधी असलेले महत्वाच्या मुद्यांवर मागदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.शशिकांत जाधवर व सुत्रसंचालन प्रा.कळसकर यानी केले. आभार प्रा.जगताप यानी मानले.यावेळी आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.अनिल जगताप या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.घाडगे डॉ.विद्युलता पवार व प्रा.मनिषा कळसकर तसेच प्रा.ज्योतीराम जाधव डॉ.हनुमंत माने, प्रा.विनायक मिटकरी डॉ. अनंत नरवडे, प्रा.पंडित शिंदे,डॉ.उद्धव गंभिरे, प्रा.शफीक चौधरी,प्रा.शिव खबाले प्रा. अमोल शिंगटे,प्रा.महेश पवार डॉ.महावीर गायकवाड डॉ.हंडीबाग प्रा.अमर खबाले प्रा.अभिमान ढहाणे प्रा. नामदेव तोडकर प्रा. राजाभाऊ चोरघडे प्रा. विजय घोळवे प्रा. सोमनाथ कसबे श्री.फावडे,शेंडगे,जयसिंग चौधरी,प्रा.चोंदे मॅडम,काका चोंदे,सुंदर कदम,अशोक भोसले दत्तात्रय गायकवाड, दत्ता कांबळे यांच्यासह शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
५ सप्टेंबर, २०२३
Home
Unlabelled
छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये नविन शैक्षाणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न
छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये नविन शैक्षाणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.