शेतकरी राजा खरच सर्व संकटाना तोंड देवून केवळ आशेवर जगणाऱ्या शेतकरी बांधावा एवढा उदार दुसरा कोणी असेल असे वाटत नाही.शेती करत असताना किती तरी संकट येतात हाता तोंडाला आलेला घास निसर्गाच्या लहरपणामुळे तर रक्ताच पाणी करून पिकवलेल्या मालाला भावच नाही, खत बियानेच मिळू नये तर कधी अनंत संकटे सोबत घेवून जगताना पुढे चांगले होईल याची आशा कधी ना सोडणारा शेतकरी बाकी क्षेत्रात तणावाखाली आलेल्यांनी अभ्यास करावा असा मोठा विषय आहे.
गेल्या मिनाभरा पासून दडी मारून बसलेला पाऊस होरपळून निघालेल कोवळ पीक एवढ्या अंतराने पडलेला पाऊस तो ही फक्त त्या पिकाची आंघोळ व्हावी एवढाच. फुलोरा, शेंगा, पान गळून गेलं तरी पडलेल्या चार थेंबावर समाधान मानत ''पडती भावना झालीय पडल आता हळूहळू '' अस म्हणणारा शेतकरी पाहिला की वाटत यामुळेच शेतकऱ्याला राजा म्हणतात. कितीही संकटात असो तो आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देईल परंतु लाखो रुपये पगार असूनही बाजारात उशिरा गेल्यावर भाजीपाला स्वस्त मिळतो म्हणून त्याच्या आर्थिक अडचणीत भार लावणारी काही मंडळी आहेत यांना काय नाव द्यावे हे आपणच सांगा.