कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब. आयक्युएसी/मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी महाविद्यालयात 'मराठी राजभाषा दिनानिमित्त'मराठी भाषेचे महत्त्व/वाचन संस्कृती जपणे काळाची गरज' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री.सोपान पवार आणि मा.श्री.अश्रूबा कोठावळे हे होते.कार्यक्रमाध्यक्ष प्रा.डॉ. हनुमंत माने(मराठी विभाग प्रमुख) तर प्रमुख उपस्थितीत प्रा.शफिक चौधरी, डॉ.विद्युलता पवार,कु.वैष्णवी कळढोण (अध्यक्ष ,मराठी वाड्:मय मंडळ ) हे होते.या मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.सोपान पवार म्हणाले की,"मराठी भाषा अमृताशी पैजा जिंकणारी आहे.या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे."या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. श्री.अश्रुबा कोठावळे म्हणाले की," विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील ग्रंथाचा आस्वाद घेणे गरजेचे आहे."या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये कु.सानिका गायकवाड,कु.वैष्णवी कलढोण कु.प्राजक्ता मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.अध्यक्षीय समारोपा मध्ये प्रा.डॉ. हनुमंत माने यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.गोदावरी कदम या विद्यार्थिनीने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.सानिका गायकवाड यांनी केले तर आभार कु.प्राजक्ता मोरे या विद्यार्थिनींने मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. महावीर गायकवाड, प्रा.डॉ.संदीप हंडीबाग, प्रा.विनायक मिटकरी , दत्तात्रय गायकवाड,सुंदर कदम,काका चोंदे,दत्ता कांबळे,अशोक भोसले तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
२८ फेब्रुवारी, २०२३
Home
Unlabelled
छ.शिवाजी महाविद्यालयात 'मराठी राजभाषा दिन' सम्पन्न
छ.शिवाजी महाविद्यालयात 'मराठी राजभाषा दिन' सम्पन्न
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.