छ.शिवाजी महाविद्यालयाची 'शैक्षणिक सहल' संपन्न - kalayog

२७ फेब्रुवारी, २०२३

छ.शिवाजी महाविद्यालयाची 'शैक्षणिक सहल' संपन्न


कळंब :  छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब आयक्युएसी व अर्थशास्र, भूगोल व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय शैक्षणिक सहलीचे आयोजन दि.२४/०२/२०२३ शुक्रवार या दिवशी करण्यात आले होते.या सहलीचे प्रस्थान संस्थेचे सहसचिव प्रा.संजयजी घुले यांचे हस्ते नारळ फोडून करण्यात आले.यावेळी श्री.घुले सर व प्राचार्य. शशिकांत जाधवर यानी सर्वाना सहलीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सहलीचे आयोजक प्रा. डॉ.अनंत नरवडे,प्रा. डॉ.उद्धव गंभीरे प्रा.अनिल जगताप व  प्रा.शफीक चौधरी,  प्रा.मनीषा कळसकर,प्रा.सुनिता चोंदे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या सहलीचे मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भूगोल,अर्थशास्त्र व इतिहास या विषयाचे सखोल ज्ञान मिळावे या दृष्टीने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.या एकदिवसीय सहलीमध्ये धनेगाव धरण,नॅचरल शुगर फॅक्टरी (रांजणी) ऐतिहासिक स्थळ संत गोरोबा तीर्थक्षेत्र (तेर) व येडशी येथील प्रसिद्ध रामलिंग मंदिर इ. भौगोलिक,आर्थिक व ऐतिहासिक ठिकाणी भेटी दिल्या व विद्यार्थ्यांना त्या विषया संबंधी सखोल माहिती देण्यात आली.या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोल तसेच शुगर फॅक्टरी चे अर्थकारण व ऐतिहासिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक स्थळांचे महत्व या संबंधी भरपूर माहिती मिळाली.सहल यशस्वी करण्यासाठी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अनंत नरवडे,भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.उद्धव गंभीरे, प्रा.मनीषा कळसकर मॅडम,प्रा.सुनिता चोंदे मॅडम प्रा.अनिल जगताप प्रा.शफीक चौधरी, डॉ.संदिप हांडीबाग, डॉ.महेश पवार तसेच विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.