कळंब:- दि.२६/२/२०२३ रोजी शिवजन्मोत्सव व जागतिक महिला दिनानिमित्त कळंब येथील इनरव्हिल क्लब आँफ कळंब व युनिक फिजिओथेरपी अँन्ड रिहँबीलेटेशन कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिजिओथेरपी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
तसेच युनिक फिजिओथेरपी कळंबचे संचालक डॉ.संजित पाखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व १२२ रुग्णांवर मोफत उपचार केले. यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ. वर्षा जाधव ,सचिव डॉ. मिनाक्षी भवर (शिंदे),प्रोजेक्ट चेअरमन सौ.प्रतिभा भवर(गांगर्डे) उपस्थित होत्या.हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी डॉ. पाखरे व त्यांचा सर्व स्टाफ, सौ.भारती शिंदे, इनरव्हिल क्लबच्या सदस्या सौ.निशा कळंबकर,सौ.संगिता घुले,सौ.राजश्री देशमुख,डॉ. सुनंदा अनिगुंठे, सौ.स्वाती राजमाने, डॉ. आकांक्षा पाटील, डॉ. अश्विनी पवार,डॉ. संजीवनी जाधवर, सौ.अंजली मोहेकर,सौ.शुभांगी गोरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. मिनाक्षी भवर (शिंदे) यांनी केले व सुत्रसंचालन डॉ. आकांक्षा पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सौ.प्रतिभा भवर यांनी मानले.