- उस्मानाबाद – उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव तर औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने या दोन्ही शहराची नावे बदलण्याच्या निर्णयास केंद्र सरकारनेही मंजुरी दिल्याने यापुढे आता यादोन्ही जिल्ह्याची नावे धाराशिव व छत्रपती संभाजीनगर झाली आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याच्या पुर्वी झालेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या
बैठकीत उस्मानाबाद शहराचे धाराशिव तर औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय झाला होता. परंतू या निर्णयानंतर केंद्राची मंजुरी मिळालेली नव्हती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपाचे सरकार राज्यात आल्यानंतर या सरकारने या दोन्ही शहराची नावे बदलण्याचा निर्णय घेवून केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने उस्मानाबाद शहराचे धाराशिव व औरंगाबाद आहेत.
शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यास कोणतीही हारकत नसल्याचे सांगितले असून या दोन्ही शहराच्या नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नामांतरानंतर नवीन नावाचे स्पेलिंग देवनागरी (हिंदी), रोमन (इंग्रजी) व प्रादेशिक (मराठी) भाषांमध्ये आवश्यक राजपत्रात अधिसूचना जारी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. या अधिसुचनेच्या प्रती संबंधित सर्व विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
२५ फेब्रुवारी, २०२३
Home
Unlabelled
दोन्ही जिल्ह्याची नावे धाराशिव व छत्रपती संभाजीनगर झाली
दोन्ही जिल्ह्याची नावे धाराशिव व छत्रपती संभाजीनगर झाली
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.