छ.शिवाजी महाविद्यालयात 'संत गाडगेबाबा' जयंती साजरी - kalayog

२३ फेब्रुवारी, २०२३

छ.शिवाजी महाविद्यालयात 'संत गाडगेबाबा' जयंती साजरी

कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा जयंती निमित्त दि.23/02/2023 रोजी   'संत गाडगेबाबा' जयंती निमित्त अभिवादन 
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी श्री.मुरलीधर चोंदे,श्री.सुंदर कदम,  श्री.दत्ता गायकवाड यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य.शशिकांत जाधवर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी  प्रा.ज्योतीराम जाधव  प्रा.मनिषा कळसकर मॅडम,श्रीमती.सारिका पडवळ,प्रा.डॉ.विद्युलता पवार, प्रा.डॉ.अनंत  नरवडे,प्रा.डॉ.सोमनाथ कसबे रासेयो विभागाची विद्यार्थी प्रतिनिधी कु.वैष्णवी कळढोण तसेच महाविद्यालयातील सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील रासेयो  विभागाच्या स्वयंसेवकांनी  महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करून संत गाडगेबाबा यांना आदरांजली अर्पण केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.