कळंब :- कळंब येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 147 वी जयंती संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त दिनांक 23 फेब्रुवारी संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब येथे युवा नेते सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं प्रमुख व्याख्याते म्हणून पत्रकार माधवसिंग राजपूत ,संतगाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ जाधव, परीट धोबी संघटनेचे ओम शिंदे ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू ( आबा) ताटे ,आलूतेदार बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पांचाळ ओबीसी ब्रिगेड संघटनेचे मराठवाडा संघटक सचिन डोरले, सिद्धेश्वर राऊत, उत्तरेश्वर मुळे मुख्याध्यापक बालाजी जाधवर यांची उपस्थिती होती याप्रसंगी व्याख्याते माधवसिंग राजपूत यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले त्यांनी याप्रसंगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी अज्ञान, अंधश्रद्धा ,कर्जबाजारीपणा व्यसनाधीनता या विषयावर समाजाला समजेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन केले त्यांनी शिक्षणसंस्था, आश्रम शाळा, धर्मशाळा यांची स्थापना केली आयुष्यभर आपल्याबरोबर झाडू घेऊन परिसर ,गाव व विचाराच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करण्याचं काम केल्याचे सांगितले या कार्यक्रमात बंडू (आबा )ताटे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम साईंन लँग्वेज माध्यमातून शिक्षिका सुनीता गुंड यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी माहिती दिली यानंतर संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत गाडगेबाबा चौक ढोकी रोड येथे नाम फलकाचे पूजन ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ जाधव यांनी सूत्रसंचालन अश्रुबा कोठावळे यांनी तर आभार सचिन डोरले यांनी मानले य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालयाचे शिक्षक गोवर्धन चव्हाण, सुनीता गुंड, तुकाराम अडसूळ, अंकुश गव्हाणे यांनी परिश्रम घेतले
२८ फेब्रुवारी, २०२३
Home
Unlabelled
संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतिने संत गाडगे महाराज जयंती साजरी
संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतिने संत गाडगे महाराज जयंती साजरी
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.