कळंब, प्रतिनिधी - मानवाच्या आयुष्यात अनेक वेळा अस्वस्थ करणारे प्रसंग येतात यावेळी व्यक्तिने संयम राखला तर अस्वस्थततेनंतर आपल्या आयुष्यात नवनिर्मिती घडून येते असे उदगार भैरवनाथ अदयापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी तालुक्यातील हसेगाव (के) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयातील स्वयंशासन दिन व दहावीच्या निरोप समारंभात काढले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीजयोती सावित्रीबाई फुले व पद्मश्री शंकरबापू यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा सतीश मातने प्रमुख पाहुणे म्हणून नागेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव किरण पाटील, आबासाहेब रणदिवे, विनोद रणदिवे, वैभव गपाट, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर उपस्थित होते.
पुढे बोलताना मातने म्हणाले की दहावी नंतर शिक्षणाची अनेक पर्याय उपलब्ध असतात यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ. अपयश आले तर खचून जावू नका जगात यशस्वी होण्यासाठी लाखो पर्याय उपलब्ध आहेत फक्त आपल्याला तो पर्याय निवडता आला पाहिजे. यासाठी आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. यावेळी आपण आपल्या शिक्षकांचे व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
सध्या गुगलवर आपल्याला सर्व क्षेत्राची माहिती मिळते ती आपण घेतली पाहिजे. सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर केला तर या मध्ये मोठ्या प्रमाणावर ज्ञान प्राप्त होते.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून अभिषेक तोडकर व उपमुख्याध्यापक म्हणून अस्मिता तांबारे यांनी काम पाहिले. यावेळी शाळेतील एन एम एम एस परीक्षेत यश मिळविलेला विद्यार्थी सिध्दार्थ रणदिवे याचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले तर सूत्रसंचालन बाबासाहेब दराडे यांनी केले आभार आदिक हजारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हे दत्ता, कुंभार मॅडम, संतोष कोरे, उर्मिला कुरूंद यांनी केले.