[16/02, 12:28 pm] Kalayog: कळंब: कळंब तालुक्यातील भोगजी ते कळंब रस्त्यावरील वाशीरा नदीतील पुलावरून वर चढताना रस्त्याला पडलेल्या खड्ड्यातून मार्गक्रमण करत असताना मोठे दिव्य पार पाढल्याची अनुभूती येते.रस्ते प्रशासनाला वारंवार सूचना करून ,उपोषण आंदोलन करून देखील जाग का येत नाही किंवा जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे असा प्रश्न पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातानाची थंडी गारव्याची परवा न करता मुक्या प्राण्याच्या सोबतीने काबाडकष्ट करताना रस्ते प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाठीवरील ओझ्यासहित गाडी फरफटत जाऊन मुका प्राणी कायमचा अधू होतो त्या कष्टकर्यावर ओढवलेल्या संकटाची विचारपूस करायला देखील कोणी धजावत नाही. वातानुकूलित खोलीत टक्केवारीची आकडेमोड करत बसणाऱ्या व आम्ही शेतकऱ्याचीच पोर आहोत म्हणून खोटी फुशारकी मिरवणाऱ्या महोदयांना कधी पाझर फुटणार. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं नाटक कुठपर्यंत चालणार बुजवलेले खड्डे पंधरा दिवसात जशास तसे ? असा करत आहोत आम्ही आमच्या शिक्षणाचा हुशारीचा उपयोग. होत असलेली जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्ते प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना करावी अन्यथा नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे
१५ फेब्रुवारी, २०२३
Home
Unlabelled
मुक्या प्राण्याचा ,माणसाचा जीव घेण्यासाठी भुकेजलेलं रस्ते प्रशासन
मुक्या प्राण्याचा ,माणसाचा जीव घेण्यासाठी भुकेजलेलं रस्ते प्रशासन
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.