छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंबचे कर्मचारी बेमुदत संपावर - kalayog

२० फेब्रुवारी, २०२३

छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंबचे कर्मचारी बेमुदत संपावर

कळंब महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या व राज्यातील इतर संघटनांच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपत छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंबचे शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत महासंघाच्या व इतर संघटनांच्या वतीने विविध मागण्या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता परंतु शासनाने सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय न घेतल्यामुळे शासनास लोकशाहीच्या मार्गाने विविध टप्प्यावर आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाचा एक भाग म्हणून दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून सर्व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. सदर संपात श्री किशोर फावडे, श्रीमती सारिका पडवळ ,श्री चौधरी जयसिंग, गायकवाड दत्तात्रय, कदम सुंदर, लाटे सुनील ,शेंडगे संजय ,चोंदे मुरलीधर ,घोगरे अर्जुन, भोसले अशोक, कांबळे दत्तात्रय आदी कर्मचारी सामील झाले आहेत