ड्रॉइंग ग्रेड परीक्षा जि प प्रशाला ईटकुर चा शंभर टक्के निकाल - kalayog

२२ जानेवारी, २०२३

ड्रॉइंग ग्रेड परीक्षा जि प प्रशाला ईटकुर चा शंभर टक्के निकाल

कळंब: कला संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे 2022 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखा कला परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला ईटकुर तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद चा सलग 5 वे वर्ष ही शंभर टक्के निकाल लागला. यात इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण 22 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 1   अ, श्रेणी व 7 विद्यार्थी ब,श्रेणीत तर 14 विद्यार्थी  क श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत 6 विद्यार्थी क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते या परीक्षेतील ग्रेड नुसार विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये त्याचे गुण मिळतात. या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे कडून  कौतुक केले जात आहे.